चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या

सोलापूर : बार्शी शहरातील बार्शी-परांडा रस्त्यावर भरदिवसा रस्त्यावर पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना सोमवार दि. २५ मे रोजी घडली. धनश्री ऋषिकेश पाटील(२४ वर्षे)असे खून झालेल्या महिलेचे नाव असून ऋषिकेश पाटील (३० ) यांनी हे कृत्य केले आणि शेवटी स्वत:हून बार्शी शहर पोलिस ठाण्यात हजर होऊन पोलिसांत आत्मसमर्पण केले.

या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून हे खून प्रकरण घडले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पाटील हा बजाज फायनान्समध्ये तर धनश्री पाटील या आय.डी.एफ.सी बँकेत नोकरीला आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी प्रेमविवाह केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी बार्शी-परंडा रोडवर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद अचानक चिघळल्यानंतर रागाच्या भरात ऋषिकेशने पत्नी धनश्रीवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. सदर घटना पाहिलेल्या नागरिकांनी ऋषिकेशला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र हस्तक्षेप करणा-यांना ऋषिकेशने शिवीगाळ केली आणि चाकूचा धाक दाखविल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींना बघ्याची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी स्वत:हून बार्शी ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर
आरोपीने पत्नीवर तब्बल ५० वार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गंभीर जखमी झालेली धनश्री भर रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली घटनेनंतर आरोपी ऋषिकेश पाटील स्वत:हून बार्शी ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सहा वर्षांचा चिमुकला झाला पोरका
धनश्री आणि ऋषिकेश यांचा २०१८ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना ६ वर्षांचा एक मुलगाही आहे. सुरुवातीची ४ ते ५ वर्ष सुखी संसार चालला नंतर अधून मधून भांडणे होऊ लागली. आरोपी ऋषीकेषला दारूचे व्यसन लागले होते. तो धनश्रीला सतत चारित्र्याच्या संशयावरून मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धनश्रीची आई आजारी असल्याने ती उपचारासाठी वारंवार माहेरी जात होती. याच कारणावरूनही ऋषीकेष व तिच्याशी वाद होत होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news