27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयपत्नीला सार्वजनिक ठिकाणी थापड मारणे हा गुन्हा!

पत्नीला सार्वजनिक ठिकाणी थापड मारणे हा गुन्हा!

नवी दिल्ली : भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत पत्नीला सार्वजनिक ठिकाणी थप्पड मारणे, म्हणजे तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा अपराध नाही. असे जम्मू-काश्मीर आणि लद्दाख उच्च न्यायालयाने एका व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले आहे. या याचिकेच्या माध्यमाने ट्रायल कोर्टाकडून इश्युएंस ऑफ प्रोसेसला आव्हान देण्यात आले होते. सुनावणीवेळी न्यायालयाने ट्रायल कोर्टाचे इश्युएंस ऑफ प्रोसेस फेटाळून लावले. मात्र, कलम ३२३ अंतर्गत कारवाई कायम ठेवण्यात आली.

पती आणि पत्नी यांच्यात काही वाद सुरू होता. पत्नीने दावा केला की, ती या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जेव्हा फॅमिली कोर्टात पोहोचली, तेव्हा तिच्या पतीने तिला सार्वजनिक ठिकाणी थप्पड मारली. या घटनेसंदर्भात पती विरोधात भादविच्या कलम ३२३ आणि ३५४ अंतर्गत तक्रार दाखल कण्यात आली.

पतीच्या याचिकेवर सुनावणी करणारे जस्टिस रजनीश ओसवाल म्हणाले, भादविच्या कलम ३५४ अंतर्गत हा गुन्हा होऊ शकत नाही. मात्र, जाणूनबुजून एखाद्याला हानी पोहोचवणे हा कलम ३२३ अंतर्गत अपराध होऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार, तक्रारीमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे, भादविच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा होत नाही. मात्र हा कलम ३२३ अंतर्गत गुन्हा होऊ शकतो. कारण प्रतिवादीने स्पष्टपणे नमूद केले आहे की, ती जेव्हा कारवाईमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती, तेव्हा याचिकाकर्त्याने तिला लोकांसमोर मारहाण केली आणि थप्पड मारली. महत्वाचे म्हणजे, महिलेच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने, आयपीसीच्या कलम ३५४ नुसार हा गुन्हा होऊ शकत नाही. मात्र आयपीसीच्या कलम ३२३ चा येथे विचार केला जाऊ शकतो, असेही मान्य केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR