22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयपत्नीचा प्रताप, दोन प्रियकरासोबत पतीने हॉटेलमध्ये पकडले

पत्नीचा प्रताप, दोन प्रियकरासोबत पतीने हॉटेलमध्ये पकडले

नवी दिल्ली : आज जगात काय पाहायला आणि काय ऐकायला मिळेल यांचा नेम नाही. दिल्लीतील एका घटनेत डॉक्टर पतीने आपल्या पत्नीला चक्क दोन प्रियकरांसोबत लैंगिक क्रीडा करताना हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले. त्यानंतर पतीने पत्नी आणि दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली आहे. उत्तर प्रदेशातील कसगंजमधील हा प्रकार असून सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे महिला सरकारी डॉक्टर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर पती-पत्नीमध्ये वाद होता. त्यामुळे पत्नी गेल्या एक वर्षांपासून पतीपासून वेगळे राहात होती. पतीने पत्नीचे बिंग फोडण्याचे ठरविले होते. पत्नी एका हॉटेलमध्ये असल्याची त्याला माहिती मिळाली होती. त्यानंतर तो हॉटेलमध्ये गेला आणि जबरदस्तीने हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश केला. हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश केल्यानंतर पतीला धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. पत्नी दोन प्रियकरासोबत लैंगिक क्रीडेमध्ये गुंतलेली होती. एक व्यक्ती गाझीयाबाद तर दुसरा व्यक्ती बुलदंशहरचा होता. डॉक्टर पतीला पाहून पत्नी आणि दोन व्यक्तींनी हॉटेल रुमच्या टॉयलेटमध्ये आश्रय घेतला होता.

पती आपल्या काही नातेवाईकांसोबत तिथे आला होता. त्याने पत्नी आणि त्या दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली. काहीवेळाने पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यात पती आणि त्याचे दोन नातेवाईक, दोन प्रियकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकारात महिला डॉक्टरचा सहभाग असूनही पोलिसांनी तिला अटक केलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी पुढील तपास सुरु असून नेमका प्रकार समजून घेतला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR