22.3 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभा निवडणूक लढविणार : जरांगे

विधानसभा निवडणूक लढविणार : जरांगे

१२७ जागांवर सर्व्हे
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी १२७ जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे. खुद्द जरांगे यांनी ही घोषणा केली. मात्र ते स्वत: निवडणूक लढवणार नाहीत. स्वत:चा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेले नाही. वेळ आली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार, असेही जरांगे यांनी सांगितले.

सरकारला मी वेळ दिलेला नाही, सरकारने वेळ घेतला आहे. मी अगोदरदेखील सांगितले होती की, आम्ही तयारी करत आहोत. माझा आणि माझ्या समाजाचा दोघांचाही राजकरणात येण्याचा कोणताही उद्देश नाही. पण सरकारच आम्हाला राजकारणात ढकलत आहे. आम्ही पहिल्या टप्प्यात २४ मतदारसंघाची चाचपणी केली. आम्ही शांत का बसावे? कोणत्याही समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे. इतर समाजांनीदेखील आमच्यासोबत आले पाहिजे, यासाठी चाचपणी करत आहे, असेही जरांगे म्हणाले.

मी निवडणूक लढवणार नाही
सरकारने आरक्षण दिल नाही तर मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. १२७ मतदारसंघात पहिला सर्व्हे केला आहे. इतर मतदारसंघात आणखी दुसरा सर्व्हे करणार आहे. आरक्षण दिले नाही तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार आहे. मात्र, मी स्वत: निवडणूक लढवणार नाही. स्वत:चा पक्ष की अपक्ष हे अजून ठरवले नाही. मी सर्व मतदारसंघात जाणार आहे, असे जरांगे म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यात शांतता रॅली
६ जुलैपासून मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात शांतता जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. ६ जुलै रोजी हिंगोली, ७ जुलै रोजी परभणी, ८ जुलै रोजी नांदेड, ९ जुलै रोजी लातूर, १० जुलै रोजी धाराशिव, ११ जुलै रोजी बीड, १२ जुलै रोजी जालना, १३ जुलै रोजी संभाजीनगर जिल्ह्यात रॅली असणार आहे.

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR