30.5 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeमहाराष्ट्रगुनाटच्या ग्रामस्थांचा सत्कार करणार

गुनाटच्या ग्रामस्थांचा सत्कार करणार

पोलिस आयुक्तांनी केले कौतुक

पुणे : श्रेयाचा वाद नाही. संपूर्ण टीमने केलेले हे काम केले आहे. पोलिस अधिकारी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होते. टीम तिथे तळ ठोकून होती. काही अधिकारी तीन दिवस तिथे होते. काही अधिकारी झोपलेही नाही. सर्व पोलिस आणि अधिकारी एकत्र होते. गावातील नागरिकांनी सहकार्य केले. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे. स्वारगेट अत्याचार घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याला काल पोलिसानी अटक केली आहे. त्यानंतर आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलताना अमितेश कुमार यांनी सांगितले की, स्वारगेट पोलिस स्टेशन, क्राईम ब्रांच अंदाजे ५०० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी या ऑपरेशनमद्ये होते. तीन दिवसापासून गुनाट गावातील ४०० ते ५०० स्थानिक लोकांचे सहकार्य मिळाले. आम्ही गावक-यांचे आभारी आहोत. आम्ही गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार देखील करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR