31.6 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeमहाराष्ट्रतुरुंगात जाईन पण माफी मागणार नाही

तुरुंगात जाईन पण माफी मागणार नाही

सुषमा अंधारे यांचे नीलम गो-हे यांना पत्र

मुंबई : हक्कभंग कारवाईच्या संदर्भात उपसभापती नीलम गो-हे यांनी दिलेल्या निर्देशांबाबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी पत्र लिहिले आहे. मी माफी अजिबात मागणार नाही. यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरी माझी तयारी आहे, असे अंधारे यांनी पत्रात म्हटले आहे.

उपसभापती नीलम गो-हे रवींद्र धंगेकरांना सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हीडीओ सुषमा अंधारेंनी प्रसिद्ध केला होता. मुळात धंगेकर या सभागृहाचे सदस्य नाहीत त्यामुळे तात्काळ सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली होती.

त्यानंतर अंधारेंना आठ दिवसांत दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले होते. तसेच दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रवीण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन, असे नीलम गो-हे म्हणाल्या होत्या. त्यानंतर सुषमा अंधारेंनी हे पत्र लिहिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR