21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयभारताला रशियाचे बॉम्बर मिळणार?

भारताला रशियाचे बॉम्बर मिळणार?

मॉस्को : रशियाने भारताला त्यांच्या सर्वात ताकदवान बॉम्बवर्षक टीयू-१६० या बॉम्बर विमानाच्या खरेदीच्या प्रस्ताव ठेवला आहे. भारताकडे सध्या एकही बॉम्बर विमान नाही. या रशियन बॉम्बर विमानाची खेरदी जर भारताने केली तर या विमानाने बॉम्ब, हायपरसॉनिक मिसाईल, तसचे क्रुझ मिसाईल देखील डागणे शक्य होणार आहे.

रशियाचे टीयू-१६० या लांबपल्ल्याच्या बॉम्बवर्षक विमानाला व्हाईट स्वान असेही म्हटले जाते. हे बॉम्बर शत्रूंच्या मुलखात जाऊन कामगिरी बजावून परत येण्यात माहीर आहे. तेही अगदी शांतपणे आपली कामगिरी करुन पुन्हा माघारी येते. टीयू-१६० हे एक सुपरसॉनिक व्हॅरिएबल स्वीप विंग हेव्ही स्टॅटेजिक बॉम्बर आहे. याचे डिझाईन १९७० मध्ये सोव्हीएत संघाच्या के तुपोलेव्ह यांनी केले होते. याचे उड्डाण डिसेंबर १९८१ मध्ये झाले होते. १९८७ पासून हे विमान रशियन एअरोस्पेस फोर्समध्ये तैनात आहे. टीयू १६० बॉम्बरचे ९ टेस्ट प्लेन तयार करण्यात आले होते.

रशियाकडे सध्या १६ बॉम्बर आहेत
साल २०१६ पासून आतापर्यंत रशियन एअर फोर्समध्ये लॉंग रेंज एव्हीएशन ब्रँचमध्ये १६ विमाने दाखल आहेत. रशियन सैन्यात ५० नवीन टीयू १६० बॉम्बर्सना सामिल करण्याची योजना आहे. या विमानाचे उड्डाण चार जण मिळून करतात. यात पायलट, को-पायलट, बॉम्बबॉर्डियर आणि डिफेंसिव्ह सिस्टीम ऑफीसरचा समावेश आहे. हे विमान १७७.६ फूट लांबीचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR