22.9 C
Latur
Thursday, October 2, 2025
Homeअंतरराष्ट्रीयभारत गाझामध्ये सैन्य पाठवणार?

भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार?

संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली चीन आणि पाकिस्तानला बोलण्याचे आवाहन

न्यूयॉर्क : मागील काही दिवसांपासून गाझामध्ये हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यामुळे गाझाची परिस्थिती बिघडली आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर, भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिक देशांच्या लष्कर प्रमुखांची परिषद १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान राजधानी दिल्ली येथे होणार आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकी कारवायांमध्ये योगदान देणा-या सुमारे ३० देशांचे वरिष्ठ लष्करी नेतृत्व यात सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे, भारताने या परिषदेत सहभागी होण्यासाठी चीन आणि पाकिस्तानला आमंत्रित केलेले नाही. शिवाय, भारताने गाझा आणि युक्रेनसारख्या युद्धग्रस्त भागात आपल्या सैन्याच्या तैनातीलाही स्पष्ट प्रतिसाद दिला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने परवानगी दिल्याशिवाय भारत युक्रेन किंवा गाझा सारख्या परदेशी संघर्ष क्षेत्रात सैन्य तैनात करणार नाही. इतर देशांमध्ये सैन्य तैनात करणे केवळ संयुक्त राष्ट्रांच्या ध्वजाखाली असेल असे भारताचे म्हणणे आहे. १ ऑक्टोबर रोजी झालेल्या कर्टन रेझर कार्यक्रमात, लेफ्टनंट जनरल राकेश कपूर, एव्हीएसएम, व्हीएसएम, उप-सेनाप्रमुख यांनी लष्करप्रमुखांच्या वतीने उपस्थितांना संबोधित केले. सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केले. त्यांनी सांगितले की, या बहुपक्षीय कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा भारताला सन्मान आहे. या परिषदेचे उद्दिष्ट एक समान व्यासपीठ तयार करणे होते तिथे विविध देशांचे आणि सैन्यांचे अनुभव, दृष्टिकोन आणि वचनबद्धता एकत्रित होऊन संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर अंतर्गत शांतता राखण्याच्या जबाबदा-यांवर चर्चा करतील.

भारताचे मोठे योगदान
कार्यक्रमात असे म्हटले आहे की हे भारताच्या सांस्कृतिक मूल्यांचे, नैतिक परराष्ट्र धोरणाचे आणि जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठीच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. गेल्या ७५ वर्षांत, भारताने ५० मोहिमांमध्ये २९०,००० हून अधिक शांती सैनिक तैनात केले आहेत, त्यापैकी १८२ जणांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. २००७ मध्ये, भारताने लायबेरियामध्ये पहिली पूर्णपणे महिला पोलिस तुकडी तैनात करून इतिहास घडवला. अलीकडेच, फेब्रुवारीमध्ये, भारताने ग्लोबल साउथमधील महिला शांती सैनिकांची एक परिषद आयोजित केली होती, यामध्ये ३५ देशांनी भाग घेतला होता.

भारताचे उपक्रम
२०२१ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काळात, भारताने यूएन शांतीरक्षकांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी जबाबदारी आणि शांतता निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञान यासारख्या प्रमुख कागदपत्रांचा स्वीकार करण्यात भूमिका बजावली. जून २०२३ मध्ये, भारताने न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात शांतीरक्षकांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक भिंत उभारण्याचा ठराव मांडला. भारताने सुधारित आदेश, शांतीरक्षकांची सुरक्षा आणि योगदान देणा-या देशांचे योग्य प्रतिनिधित्व यासाठी सातत्याने वकिली केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR