23.5 C
Latur
Friday, May 23, 2025
Homeमनोरंजनआता पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या?

आता पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या?

हेरा फेरी मध्ये काम करणार नाही, त्रिपाठीचा खुलासा

मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ सोडला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. परेश रावल यांनी हेरा फेरी ३ सोडल्याने सिनेमाच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. आता परेश रावल यांची जागा कोण घेणार, याशिवाय हेरा फेरी ३ मध्ये बाबू भैय्याच्या भूमिकेत कोण दिसणार? याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. अशातच बाबूभैय्याच्या भूमिकेसाठी परेश रावल यांच्या जागी पंकज त्रिपाठींचे नाव पुढे आले.

पंकज त्रिपाठी सध्या त्यांची आगामी वेबसीरिज क्रिमिनल जस्टीस ४ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या प्रमोशनदरम्यान त्यांना हेरा फेरी ३ बद्दल विचारले असता पंकज म्हणाले की लोकांनी बाबूभैय्याच्या जागी माझ्या नावाचा विचार केला, हे मी सुद्धा ऐकले आहे आणि वाचले आहे. परंतु माझा विश्वास यावर नाही. परेश रावलजी खूप कमाल अभिनेते आहे. मी त्यांचा खूप मान ठेवतो. परंतु या भूमिकेसाठी मी योग्य व्यक्ती नाही, असे मला वाटते. अशाप्रकारे पंकज त्रिपाठींनी खुलासा केला. याशिवाय हेरा फेरी ३ मध्ये ते काम करणार नाहीत, याचाही खुलासा केला.

परेश रावल यांनी हेरा फेरी ३ मधून बाहेर पडल्याचे काही दिवसांपूर्वी कन्फर्म केले आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले, मला इथे स्पष्ट करायचे आहे की हेरा फेरी ३ मधून बाहेर पडण्याचा निर्णय हा मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह डिफ्रंसमुळे घेण्यात आलेला नाही. मी पुन्हा सांगतो की माझे फिल्ममेकर्ससोबत कोणताही क्रिएटिव्ह मतभेद झालेले नाहीत. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम, आदर आणि विश्वासाची भावना आहे. परेश रावल यांनी हेरा फेरी ३ सोडल्यावर अक्षय कुमारच्या कंपनीने त्यांच्यावर २५ कोटींचा दावा ठोकला होता. त्याविषयी परेश रावल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR