27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रसडून मरेल पण मागे हटणार नाही

सडून मरेल पण मागे हटणार नाही

मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी

‘मी मागे हटणार नाही. सरकारचे म्हणणे १० टक्के आरक्षण घ्यावे, मात्र मी आरक्षण दिले तरी थांबणार नाही. अटक केली तरी पोलिस ठाण्यातही आंदोलन करणार आहे. सडून मरेल पण मागे हटणार नाही. अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी शिंदे सरकारविरोधात मांडली आहे.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांचे गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, १० टक्के ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्यावे. मात्र आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे. किती दिवस सरकार दडपशाही करते ते बघू, अशी टीका पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी सरकारवर केली आहे.

आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित
यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली. मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित करत असल्याचे त्यांनी नमूद केले. परीक्षा सुरू असल्याने ३ मार्चपर्यंत आंदोलन स्थगित पण साखळी उपोषण सुरू आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

गृहमंत्र्यांकडून जातीय द्वेष सुरू
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, मी मागे हटणार नाही. मी १० टक्के आरक्षण स्वीकारणार नाही, अटक करून जेलमध्ये टाकले तरी मी हटणार नाही. मी जेलमध्ये देखील आमरण उपोषण करेन. ज्यांना १० टक्के आरक्ष घ्यायचे त्यांनी घ्यावे पण आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहजे. सरकार किती दिवस दडपशाही करते ते बघू. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जातीय द्वेष करत आहेत. मराठ्यांविषयी खुन्नस गृहमंत्री बंदूक दाखवून देत आहेत, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.

राजकीय स्वार्थासाठी मराठ्यांचे नुकसान
गोरगरीब मराठ्यांनी मतदान केले म्हणून तुमच्या नेत्यांनी तुम्हाला जवळ केले. मी बोललो देवेंद्र फडणवीस यांना, मात्र याचा राग मराठ्यांच्या नेत्यांना आला. मराठा नेत्यांना जनता की नेता हवा आहे, असा प्रश्न जरांगे यांनी विचारला. तुमच्या स्वार्थासाठी मराठ्यांचे नुकसान करू नका. यांनी मला अटक केली तरीही मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे, असेही जरांगे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR