‘शक्ती शालिनी’ ठरणार नानांचा शेवटचा चित्रपट?

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आता आपल्यात नाहीत. वयाच्या ७५व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काल त्यांचे निधन झाले. नाना यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे चाहते आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत नाना यांनी सुमारे ९० चित्रपटांमध्ये काम केलं आणि आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. २०२६ मध्येही नाना पाटेकर अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसले.

आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. नाना यांना शेवटचं पडद्यावर पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी भावुक क्षण असणार आहे. नाना पाटेकर यांचा ‘शक्ती शालिनी’ हा शेवटचा चित्रपट ठरू शकतो. या चित्रपटातून त्यांना शेवटचे पडद्यावर पाहणे चाहत्यांसाठी नक्कीच भावुक असेल. हा चित्रपट मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी विश्वाचा भाग आहे. आदित्य सरपोतदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नाना पाटेकर यांच्यासोबत अनीत पड्डा आणि विशाल जेठवा हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

कधी प्रदर्शित होणार ‘शक्ती शालिनी’?
‘शक्ती शालिनी’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून नाना पाटेकर यांनी त्यांच्या वाट्याचे शूटिंग आधीच पूर्ण केली होती. हा चित्रपट याच वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. ‘पिंकव्हिला’च्या रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट आता जानेवारी २०२७ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43

Latest news