Homeमनोरंजनमोदी कुटुंबाची सून होणार श्रद्धा कपूर?

मोदी कुटुंबाची सून होणार श्रद्धा कपूर?

मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धाच्या लग्नाच्या जोरदार चर्चा आहेत. पटकथालेखक राहुल मोदीला ती डेट करत असून हे दोघे लग्नाचा विचार करत असल्याचे म्हटले गेले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रद्धाची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर चर्चेत आले आहे.

तेजस्विनी कोल्हापुरे यांना श्रद्धा कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्या हसल्या आणि म्हणाल्या, ‘खरेच का? मला त्याविषयी काहीच माहिती नाही, कसलीच कल्पना नाही.’ यावेळी त्या श्रद्धाच्या अभिनयक्षेत्रातील कामाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या.

श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या डेटिंगच्या चर्चा सर्वांत आधी २०२४ मध्ये होत्या. त्यानंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यालाही दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. २०२४ मध्ये श्रद्धाने राहुलसोबत फोटोसुद्धा शेअर केला होता. नंतर ब-याच रिपोर्टस्मध्ये त्यांचे ब्रेकअप झाल्याचेही म्हटले गेले परंतु २०२५ मध्ये पुन्हा त्यांना एकत्र पाहिले गेले. श्रद्धा किंवा राहुलने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी सोशल मीडियाद्वारे अनेकदा श्रद्धाने अप्रत्यक्षपणे तिचे प्रेम व्यक्त केले आहे.

राहुल मोदी हा पटकथालेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची श्रद्धा कपूरशी भेट झाली. राहुलने याआधी ‘प्यार का पंचनामा २’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटांसाठी काम केले आहे. राहुल हा श्रद्धापेक्षा वयाने लहान असल्याचे कळते. त्याचे वय ३५ वर्षे असून श्रद्धा कपूर ही ३८ वर्षांची आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR