24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रसुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढविणार?

सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढविणार?

नगर : प्रतिनिधी
अहमदनगरच्या राजकारणातील आताची सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. संगमनेर मतदारसंघातून माजी खासदार सुजय विखे पाटील यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुजय विखे पाटील यांनी संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी दाखवली होती.

मात्र एकाच घरत दोघांना उमेदवारी नको असे सांगत भाजपने त्यांना तिकिट नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. महायुतीमध्ये संगमनेरची जागा ही शिवसेनेकडे आहे. त्यामुळे या जागेवर कोणता उमेदवार असणार याबाबत चर्चा रंगली आहे. सुजय विखे पाटलांना उमेदवारी नाकारल्याने बाळासाहेब थोरात आणि सुजज विखेमधील बिग फाईट टळण्याची शक्यता आहे.

सुजय विखेंना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आलेली असतानाच राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. विखे पाटील आणि जरांगे यांच्या बंददाराआड झालेल्या चर्चेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सुजय विखे पाटील अपक्ष लढण्याबाबत चाचपणी करत नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आहे.

अपक्ष लढायचे असल्यास मराठा समाजाची रसद मिळेल का याचा राधाकृष्ण विखे पाटील अंदाज तर घेत नाहीत ना असेही बोलले जात आहे. सुजय विखे पाटील यांनी यापूर्वी संगमनेर किंवा राहुरीतून लढण्याची तयारी दाखवली होती.

सुजय विखे पाटील अपक्ष लढणार?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुजय विखे पाटलांनी नगर दक्षिणमधून काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले होते. तसे विखे पाटील घराण्याला पक्ष बदलणे नवे नाही. त्यामुळे राज्यातील बदललेले राजकीय वारे पाहून सुजय विखे पाटील अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेऊ शकतात असे बोलले जात आहे.

ब्राह्मण समाजाची भाजपकडे मागणी
राज्यातील २८८ पैकी ३० जागांवर ब्राह्मण समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाने केली आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघही ब्राह्मण समाजालाच द्यावा आणि त्या जागेवर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंना उमेदवारी द्यावी, अशी मागणीही ब्राह्मण समाजाने केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR