मंत्रिपद राहणार, कृषी खाते जाणार?

मुंबई : प्रतिनिधी
वादग्रस्त वक्तव्ये व विधानसभेत मोबाईलवर पत्ते खेळतानाची चित्रफित बाहेर आल्याने गोत्यात आलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांनी त्यांची कानउघाडणी केल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा अशी चूक होणार नाही, अशी हमी दिली. या भेटीनंतर कोकाटे मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहिल्याने त्यांचे मंत्रिपद वाचणार; पण काही दिवसांनी कृषी खाते काढले जाईल, अशी चर्चा आहे.

कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांबरोबरच छावा संघटनेचाही मोठा दबाव होता. त्यामुळे आज अजित पवार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माणिकराव कोकाटे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेतली. या दोघांची तब्बल तासभर चर्चा झाली. अजित पवार यांनी कोकाटेंकडून वारंवार होणा-या चुकांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तुमच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. किती वेळा तुम्हाला वाचवायचे? किती वेळा माफ करायचे? असा सवाल अजितदादांनी केल्याचे समजते. कोकाटे यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

अजित पवार यांनी त्यांना कुठलेही आश्वासन दिले नाही; परंतु मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले. यामुळे कोकाटे यांना आणखी एक संधी मिळणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन लोकांचा रोष कमी करण्यासाठी त्यांचे कृषिखाते अन्य कोणाकडे सोपवले जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56
Video thumbnail
Manoj Jaramge Andolan|मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पडसाद; लातुरात मराठा समाजाचा रास्ता रोको
01:35
Video thumbnail
Latur|जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून फक्त 32 टक्के पाणी साठा;अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा.
03:04
Video thumbnail
Latur|डिझेल संपलं! लातूर जिल्ह्यात इंधन टंचाईचे सावट
02:29
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांचा CBI तपास...
04:33
Video thumbnail
Latur|माजी आमदार धिरज देशमुखांच्या पुढाकाराने कॅनॉलला पाणी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
02:35
Video thumbnail
साकोळ येथे बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; मुस्लीम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
05:42
Video thumbnail
‘हिल हिल पोरी हिला’ वर डॅनी पंडित आणि धनश्री वर्माचा धमाका! पाहा भन्नाट डान्स रील.
00:58
Video thumbnail
नांदेडमध्ये काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात हल्लाबोल;बैलगाडीतून दुचाकी नेत काँग्रेसचं अनोखं आंदोलन
02:09
Video thumbnail
Himayatnagar|नगराध्यक्ष उतरले थेट श्रमदानात!;हिमायतनगरच्या पाणीप्रश्नावर तोडगा
01:37
Video thumbnail
Latur\खंडापूर सप्ताहातील दानरक्कम घेऊन महाराज गायब?;“किशोर महाराजांना अटक करा” ; वारकऱ्यांचा आक्रोश
02:52
Video thumbnail
Latur|लातुरात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; २५ हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
07:20

Latest news