24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रसोन्याचा दर ७० हजारांच्या पुढे जाणार?

सोन्याचा दर ७० हजारांच्या पुढे जाणार?

जळगाव : जागतिक पातळीवर सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहेत. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात सध्या वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या गुंतवणुकीमधून ग्राहकांना २२ टक्के परतावा मिळाला आहे. त्यामुळे ग्राहकांना ही सोने खरेदी परवडली आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत सोन्याचे दर ७० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात.

शेअर बाजार वधारला की, सोन्याचे दर घसरत असल्याचे नेहमी पाहायला मिळायचे. मात्र, गेल्या पाच-सहा महिन्यांपासून हा ट्रेंड बदलला आहे. आपल्या देशातील शांततेचे वातावरण आणि चांगली अर्थव्यवस्था ही त्याची कारणं आहेत. त्यामुळे आपल्या देशात गुंतवणूक वाढून सोन्याचे दर आणि शेअर बाजार दोन्ही वधारले असल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात सध्या वाढ होताना दिसत आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत मात्र सोन्याचे दर ७० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात.

सोन्याचे दर विक्रमी पातळीवर
सोमवारी सोन्याचे दर हे सर्वाधिक विक्रमी पातळीवर म्हणजे जीएसटीसह ६६००० वर होते. मात्र, त्यानंतर आज सोन्याच्या दरात १२०० रुपयांची घसरण होऊन २४ कॅरेट सोन्याचा जीएसटीसह भाव ६४,८०० रुपये प्रति तोळ्यावर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR