रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करणार?

नवी दिल्ली : आरबीआयने या वर्षात दोनवेळा रेपो दरात कपात करुन सर्वसामान्यांचे ओझे हलके केले आहे. आता आणखी एकदा तुमचा ईएमआयचा हप्ता कमी होऊ शकतो. देशातील प्रमुख क्रेडिट रेटिंग एजन्सी केअरएजच्या ताज्या अहवालानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या आगामी डिसेंबर महिन्याच्या पतधोरण आढाव्यात २५ बेसिस पॉईंट्सने (०.२५%) रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे. वेगाने कमी होत असलेली महागाई आणि अर्थव्यवस्थेची मजबूत वाढ यामुळे आरबीआयला हा निर्णय घेण्यासाठी पुरेशी धोरणात्मक संधी मिळाली असल्याचे एजन्सीचे म्हणणे आहे.

केअरएजच्या अहवालानुसार, २०२५-२६ च्या दुस-या तिमाहीत भारताची जीडीपी वाढ ८.२% इतकी दमदार राहिली आहे. मात्र, एजन्सीने एफवाय२६ च्या उत्तरार्धात (दुस-या सहामाहीत) ही वाढ घटून सुमारे ७% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. सुरुवातीच्या महिन्यांमध्ये झालेला निर्यात वृद्धीचा परिणाम कमी होणे, सणांनंतर उपभोग सामान्य स्तरावर येणे. संपूर्ण एफवाय २६ साठी जीडीपी वाढीचा अंदाज ७.५% ठेवण्यात आला आहे. अमेरिका व्यापार वाटाघाटीतील अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावासारख्या जागतिक आव्हानांदरम्यानही भारताची बा आर्थिक स्थिती मजबूत आहे.

सध्या रेपो रेट ५.५% आहे
ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई घटून ०.३% वर आली आहे. ही गेल्या एका दशकातील सर्वात नीचांकी पातळी आहे. आरबीआयच्या ४% च्या लक्ष्यापेक्षा खूपच खाली आहे.

महागाई नियंत्रणात राहण्याची प्रमुख कारणे
– स्थिर कच्चे तेल : ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती स्थिर राहणे.
– मजबूत रब्बी हंगाम : जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची मजबूत पेरणी.
– जागतिक किंमतीवर दबाव : चीनमधील अतिरिक्त उत्पादन क्षमतेमुळे जागतिक किंमतीवर दबाव कायम आहे.

रेपो रेट कपातीची धोरणात्मक कारणे
केअरएजचे म्हणणे आहे की, पुढील १२ महिन्यांत सरासरी सीपीआय महागाई सुमारे ३.७% राहण्याची शक्यता आहे. या तुलनेत सध्याचा वास्तविक धोरण दर जवळपास १.८% आहे, जो आरबीआयच्या न्यूट्रल रेंज (१.०% ते १.५%) पेक्षा जास्त आहे. यामुळे आरबीआयकडे पतधोरण शिथिल करण्याची पुरेशी संधी आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
00:00
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news