22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमविआतील जागावाटपाचा तिढा सुटणार?

मविआतील जागावाटपाचा तिढा सुटणार?

दिल्लीत बैठकीचे आयोजन

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सर्व पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जात आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काही मतदारसंघांतील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. मविआतील जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. जागावाटपाच्या चर्चेसाठी आज दिल्लीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मविआतील वादग्रस्त जागांचा तिढा सोडवण्यासाठी आज दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.

मविआतील जागावाटपाचा तिढा आता सुटणार असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांची आज दिल्लीत जागावाटपाच्या चर्चेसाठी बैठक पार पडणार आहे. सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थित ही बैठक पार पडेल.

मविआमध्ये काही जागांवरून रस्सीखेच
महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. हा वाद मिटविण्यासाठीच दिल्लीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी जागावाटपाच्या तिढ्यावर तोडगा न काढता निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली होती. प्रचार कसा करायचा? कुठले मुद्दे घ्यायचे यावर चर्चा झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR