परभणी : समाजातील सर्व घटकांनी ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी मोठे योगदान दिले आहे. या पुढे समाजातील युवक, युवती शिक्षण व व्यवसाय उभे करून आर्थिक सक्षमता कशी येईल यासाठी काम करणार आहे. या कामी सर्व समाज एकजुटीने काम करेल, असा विश्वास परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी व्यक्त केला.
परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजासाठी नुकतेच महायुती सरकारने स्थापन केले. या महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले यांची निवड करण्यात आली. त्यानिमित्त परभणी येथे ब्राह्मण समाज बांधवांचा संवाद मेळावा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल पिंगळकर यांनी आयोजित केला होता.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील पिंगळकर, निखिल लातूरकर, अ.भा. ब्राह्मण महासंघ प्रदेश उपाध्यक्ष सोनल भोसेकर, शार्दुल चरेगावकर, सुरेन्द्र काळे, डॉ. संजय टाकळकर, सुरेश मुळे, विश्वजीत देशपांडे, सचिन वाडे पाटील, गजानन जोशी, प्रकाश केदारे, विठू गुरू वझरकर, संतोष पाठक, श्याम कुलकर्णी, भगवान पाटील, योगेश उन्हाळे, शंकर जोशी, नंदू काका पराडकर, योगेश जोशी सोनपेठकर, विलास कौसडीकर, संतोष पाठक, किशोर देशपांडे, आनंद देशमुख, दीपक कासांडे, व्यंकटेश शर्मा, सचिन भरड, शंतनू सुभेदार, नितीन सावळीकर, नितीन शुक्ल, प्रदीप जोशी, संदीप साळापुरीकर, नरेंद्र कुलकर्णी, चैतन्य कोठेकर, रोहित कनकदंडे, मयूर जोशी, कुलदीप पुरंदरे, विशाल जोशी, प्रकाश देशपांडे, रोहन धर्माधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मानवत व सेलू या दोन तालुक्यात ब्राह्मण समाजाच्या संवाद बैठकीचे आयोजन केले गेले होते.