35.8 C
Latur
Saturday, May 17, 2025
Homeमहाराष्ट्रदळवी प्रकरणात संबंधित अभियंत्याची माघार

दळवी प्रकरणात संबंधित अभियंत्याची माघार

प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचा निर्वाळा

अलिबाग : अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी महावितरणच्या अधिका-याला धमकी दिल्या प्रकरणात, संबंधित अधिका-यानेच आता माघार घेतली आहे. हा प्रकार गैरसमजुतीतून झाला असून आपली आमदारांबाबत कुठलीच तक्रार नसल्याचे स्पष्ट केले आहे. समाज माध्यमांवर या संदर्भातील ध्वनिचित्रफीत जारी केली आहे.

आमदार महेंद्र दळवी यांनी मुरूड येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता महेंद्र राठोड यांना धमकी दिल्याची ध्वनिफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. महावितरणच्या सब ऑर्डिनेट इंजिनीअर असोसिएशनने याचा निषेध करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. आमदार दळवी यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. पण आता या प्रकरणात धमकावण्यात आलेले महावितरणचे सहाय्यक महेंद्र राठोड यांनी माफीनामा जारी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

हा प्रकार गैरसमजुतीतून झाला. माझी आमदार दळवी यांच्याबद्दल कुठलीही तक्रार राहिलेली नाही. आमदारांनी एका ग्राहकाच्या तक्रारीवरून मला फोन केला होता. या फोनवरून गैरसमज निर्माण झाला. नंतर ही ध्वनिफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. आता हा गैरसमज दूर झाला असून, मी झालेल्या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आमदार दळवी यांचेही माझ्याबद्दल असलेले गैरसमज दूर झाले असल्याचे राठोड यांनी जारी केलेल्या माफीनाम्यात नमूद केले आहे. राठोड यांच्या माफीनाम्यामुळे या धमकी प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR