मुंंबई : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणा-या महिलेला खंडणी प्रकरणात अटक केली आहे. १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी घेतले ताब्यात. सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटींची मागणी केल्याचा आरोप आहे.
दरम्यान रोहित पवार म्हणाले की, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केलेल्या महिलेने करार केला होता की त्या महिलेला कुणी त्रास देणार नाही, त्या करारामुळे ते कोर्टातून सुटले. पण तो करार करण्याची गरज काय असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे. सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत. २०१६ मध्ये आमदार असताना जयकुमार गोरे यांनी महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक महिने स्वत:चे नग्न फोटो महिलेला व्हॉट्सअॅपवर पाठवले होते.
या त्रासाला कंटाळून महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी गोरेंनी प्रथम सातारा जिल्हा न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यांचा अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर गोरे यांना अटक होऊन १० दिवसांची जेलवारीही झाली होती.