24.5 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रमहिलेने पाळल्या ३५० मांजरी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

महिलेने पाळल्या ३५० मांजरी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : प्रतिनिधी
पुण्यात एका महिलेने तब्बल ३५० मांजरी घरात पाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. एका महिलेने तब्बल ३५० मांजरी घरात पाळल्याने संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचे आणि त्रासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पुण्यातील हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये ३५० मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवाशी हैराण झाले आहेत. यामुळे रहिवाशांचा मनस्ताप वाढला आहे. २०२० मध्ये पुणे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

त्यावेळी त्या संबंधित महिलेकडे ५० मांजरी असल्याचे समोर आले होते. गेल्या पाच वर्षात हा आकडा ३५० वर पोहोचला आहे. सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या मांजरांचा सतत उग्र वास येत असतो. तसेच ड्रेनेजमधून जाणारे दूषित पाणी आणि त्यांच्या रडण्याचा प्रचंड आवाज यामुळे आमचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी या मांजरी मोठ्या आवाजात ओरडत असता. त्यांचा घाण वास संपूर्ण परिसरात पसरतो. रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली आहे. यावेळी प्रशासनाला विनंती केली आहे की, या मांजरांमुळे काही आजार पसरू शकतात. त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई करावी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR