धाराशिव : प्रतिनिधी
चोरट्यांचा आता बँकेतही वावर सुरू झाला आहे. ते पाळत ठेऊन खातेदारांचे पैसे नकळत लंपास करीत आहेत. अशीच एक घटना धाराशिव शहरात दि. ८ ऑगस्ट रोजी घडली आहे. येथील महाराष्ट्र बँकेत नवीन पासबुक घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेची चोरट्यांनी पैशाची पर्स लंपास केली. या प्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाणे येथे दि. ८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील बौद्धनगर येथे राहणा-या चांदणी आप्पा सिरसाठे (३८) या दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास बॅक ऑफ महाराष्ट्र येथे नविन पासबुक घेण्याकरीता गेल्या होत्या. त्यावेळी महिला चोरट्याने चांदणी सिरसाठे यांच्या बॅगमधील पर्स लंपास केली. त्या पर्समध्ये रोख रक्कम १० हजार रूपये होती. या प्रकरणी चांदणी सिरसाठे यांनी दि. ८ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.