चंदिगड : हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी अर्थमंत्री म्हणून त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी २ लाख ५ हजार १७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
यावेळी सीएम सैनी यांनी मैथिलीशरण गुप्त यांची ‘हम क्या थे, क्या हो गए, हम क्या थे क्या हो गए और क्या होंगे अभी, आओ विचारो मिलकर ये समस्याएं सभी.’ ही कविता वाचून दाखवली जेणेकरून तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवता येईल.
नायब सैनी म्हणाले की, राज्यात लाडो लक्ष्मी योजना सुरू केली जाईल. महिलांना दरमहा २१०० रुपये दिले जातील. यासाठी अर्थसंकल्पात ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.