सोलापूर : निरोगी आयुष्य हीच मोठी संपत्ती असून शासनाच्या आरोग्य सेवेचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व ईच्छा भगवंताची मीत्र परीवार आयोजीत महिला सर्वरोग निदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी केले. अजीत पवार यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच हलग्या, ढोल ताशाच्या निनादात भलामोठा हार क्रेनद्वारे घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रम स्थळी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दीप प्रज्वलन करुन शिबीराचे उदघाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे होते.
राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मनपा आयुक्त शीतल तेली उगले, इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील,आमदार यशवंत माने, आमदार संजय शींदे, माजी आमदार जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील ,माजी आमदार राजन पाटील अनगरकर, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण महिला निरीक्षक दीपाली पांढरे, पश्चीम महाराष्ट्र युवती अध्यक्ष सोनाली गाडे, माळशीरसचे जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश पालवे, श्रीकांत शींदे, कल्याणराव काळे,सौ.रुक्मीणी जाधव, हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, महेश निकंबे यांची प्रमुख उपस्थीति होती. मान्यवरांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष कीसन जाधव, मा. नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
आरोग्य शिबी राच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना, महिलांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेत असून महिलांनी याचा लाभ घ्यावा .पैशांच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंंती असल्याचे त्यांनी सांगीतले. महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.तसेच महायुतीचे सरकार महिलांच्या आरोग्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाचे आयोजक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कीसन जाधव यांनी प्रास्तावीक करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते पाच ज्येष्ठ महिलांना साड्या व आरोग्य कीट देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व इच्छा भगवंताची परिवाराच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रुपाली चाकणकर यांनी राज्य शासनाने नुकतीच लेक लाडकी योजना आणली असून महायुतीचे सरकार महिलांच्या आरोग्या साठी कटिबध्द असल्याचे सांगीतले.
आगामी राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी तरतूद करणार असल्याचे सांगून महिलांना आत्मनिर्भर करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगीतले. किसन जाधव यांनी आपल्या भाषणात रामवाडी परिसरातील महिला प्रसुतीगृहाची सुधारणा आणी स्मशानभूमीची सुधारणा, समाजमंदीर आदी प्रश्नांसाठी निधी देण्याची मागणी केली.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व म्हणजे गोरगरीबांचे आशास्थान असून धडाकेबाज कार्यशैलीने अजितदादांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात स्थान निर्माण केल्याचे सांगीतले.