28.1 C
Latur
Wednesday, April 9, 2025
Homeपरभणीनानलपेठ पोलिस ठाण्याचा महिला कर्मचा-यांनी सांभाळला कारभार

नानलपेठ पोलिस ठाण्याचा महिला कर्मचा-यांनी सांभाळला कारभार

परभणी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आणि महिला पोलिस कर्मचा-यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून नानलपेठ पोलिस ठाणे महिला पोलिस अधिकारी व महिला कर्मचा-यांनीच सक्षमपणे सांभाळले.

या दिवशी ठाण्यातील सर्वच पदांवर महिला अधिकारी व कर्मचा-यांनी चोख कामगिरी बजावली. ठाण्याचे प्रभारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक स्वाती कावळे यांनी दिवसभर काम पाहिले. ठाणे अंमलदार करूणा मालसमिंदर, स्वागत कक्ष अधिकारी शामल धूरी, क्राईम राईटर शेख निशाद, गोपनिय शाखा सुनंदा साबणे, सीसीटीएनएस अंजली हेंद्रे, हजेरी मेजर शामबाला टाकरस यांनी काम पाहिले. यावेळी कर्तव्य बजावत असताना महिलांनी घ्यावयाची आरोग्याची काळजी या विषयावर डॉ. आशा चांडक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR