38.3 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeअंतरराष्ट्रीयव्यभिचार करणा-या महिलांना दगडाने ठेचून मारणार

व्यभिचार करणा-या महिलांना दगडाने ठेचून मारणार

काबूल : तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याचा एक ऑडिओ मेसेज नुकताच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो व्याभिचार करणा-या अफगाण महिलांना चाबकाचे फटके आणि दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा देणार असल्याचे म्हणत आहे.

तालिबानच्या या नेत्याने यावेळी त्यांचा पाश्चात्य लोकशाहीविरुद्ध लढा सुरूच राहील असेही जाहीर केले. आपल्या ऑडिओ मेसेजमध्ये मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा पाश्चात्य अधिका-यांना उद्देशून म्हणाला की जेव्हा आम्ही त्यांना दगडाने ठेचून मारू, तेव्हा तुम्ही याला महिलांच्या हक्कांचे उल्लंघन म्हणाले. पण आम्ही लवकरच व्यभिचाराच्या शिक्षेची अंमलबजावणी करू. आम्ही महिलांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे फटके मारू. आम्ही त्यांना सार्वजनिक ठिकाणी दगडाने ठेचून ठार मारू असे अखुंदजादा पुढे आपल्या मेसेजमध्ये म्हणाताना ऐकू येत आहे. अफगाणिस्तानचा सरकारी टीव्ही, आता तालिबानच्या नियंत्रणाखाली आहे. याद्वारे अखुंदजादा याचे व्हॉइस मेसेजेस प्रसारित केले जातात. तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यापासून काही जुने फोट सोडले तर अखुंदजादाला कोणीही सार्वजनिकरित्या पाहिलेले नाही. तो तालिबानचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण कंदाहारमध्ये असल्याची माहिती सतत समोर येत असते.

यूएनची जोरदार टीका
अधिक लोकाभिमुख सरकारचे आश्वासन देऊनही, तालिबानने पुन्हा एकदा क्रूर सार्वजनिक फाशी आणि फटके मारण्यासारख्या कठोर शिक्षा पुन्हा सुरू केल्या आहेत. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी तालिबानवर जोरदार टीका करत देशाच्या राज्यकर्त्यांना अशा पद्धती थांबवण्याचे आवाहन केले आहे. आपल्या ऑडिओ मेसेजमध्ये अखुंदजादा म्हणाला की, आंतरराष्ट्रीय समुदाय ज्या महिलांच्या हक्कांसाठी वकिली करत आहे ते तालिबानच्या इस्लामिक शरियाच्या कठोर व्याख्याच्या विरोधात आहे. अखुंदजादाच्या या वक्तव्यामुळे अफगाणिस्तानमध्ये संताप निर्माण झाला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी काहींनी आंतरराष्ट्रीय समुदायाला तालिबानवर दबाव वाढवण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR