मुंबई : लोकसभा-विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महिला निवडून येतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
अजित पवार गटाचा महिला पदाधिकारी मेळावा आज मुंबईत पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले.
महिला जे काम करतात ते चोखपणे करतात. कुठलंही काम असू द्या महिला पुढे येतात. आम्ही जेव्हा महिला विधेयक बील पास केलं. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत सभागृहात थांबलो होतो. रात्री तीन वाजता विधेयक मंजूर झालं. महिला सशक्तीकरणासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे, असे अजित पवार म्हणाले.