मुंबई : वृत्तसंस्था
क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) ने मंगळवार, २६ मार्च रोजी महिला आशिया चषक २०२४ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना १९ जुलै रोजी यूएई सोबत होणार आहे. तर भारतीय महिला क्रिकेट संघ २१ जुलैला पाकिस्तानशी भिडणार आहे. महिला आशिया चषकाची सुरुवात १९ जुलैपासून दंबुला येथे होणार आहे.
महिला आशिया चषकात एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान, यूएई आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश, थायलंड आणि मलेशिया यांचा समावेश आहे. ९ दिवस खेळल्या जाणा-या या स्पर्धेचा अंतिम सामना २८ जुलै रोजी दंबुला येथे होईल.
या स्पर्धेतील सर्व सामने टी-२० फॉरमॅटमध्ये खेळले जाणार आहेत. भारत हा आशिया चषक स्पर्धेतला सर्वांत यशस्वी संघ आहे, आतापर्यंत भारताने सात वेळा विजेतेपद पटकावले आहे. २०१८ मध्ये अंतिम फेरीत भारताचा पराभव करून विजेतेपद मिळवणारा बांगलादेश हा एकमेव संघ होता. २०२२ प्रमाणे या स्पधेर्तील पंच आणि सामनाधिकारी फक्त महिला असतील.
आशिया कप २०२४ चे वेळापत्रक
१९ जुलै – भारत विरुद्ध यूएई
२१ जुलै – भारत विरुद्ध पाकिस्तान
२३ जुलै – भारत विरुद्ध नेपाळ
२६ जुलै – उपान्त्य फेरीचा सामना
२८ जुलै – अंतिम सामना