मैदनाबाहेरून
विशाखापट्टणम् येथील दुसरी कसोटी रोहित शर्माच्या टीम इंडियाने अखेर चहापानापूर्वी १०६ धावांनी जिंकून पाच कसोटीच्या मालिकेत बरोबरी साध्य केली. पाहुण्यांची शेवटची विकेट राहिली असल्यामुळे चहापाण्याची वेळ अर्ध्या तासाने लांबवण्यात आली. बुमराने दुस-याच चेंडूवर टॉम हार्टलीचा त्रिफळा उडवत टीम इंडियाच्या कसोटी विजयावर शिक्कामोर्तब केले. पाहुण्यांचे तळातील फलंदाज बुमरा व मुकेश कुमारने तंबूत धाडले.
नाईट वॉचमन म्हणून आलेल्या रेहान अहमद (२३) जॅक क्रॉली (७३) यांनी १० षटके गोलंदाजी खेळून काढली. रेहान अहमदला अक्षर पटेल ने पायचीत केले. रोहित शर्माने स्लीप मध्ये ओली पोपचा सुरेख झेल पकडला. माजी कर्णधार जो रूटला अश्विनने पुन्हा एकदा मामा केले. त्यानंतर सलामी वीर व बेन स्टोक्स यांनी टीम इंडियाचा घाम काढला. क्रॉली (७३) पाय चीत असल्याचा अक्षर पटेल ने कौल मिळवला आणि टीम इंडियाच्या जीवात जीव आला. बेअरस्टोव (२६) पायचीत असल्याचा निर्णय बुमराने मिळवला.
त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स् (११) व यष्टीरक्षक वेन फॉक्स (३६) या जोडीने ५५ धावांची भागीदारी करत दमदार फलंदाजी केली. श्रेयस अय्यरच्या एका सुरेख थेट थ्रोवर कर्णधार धावबाद झाला आणि सर्व क्रिकेट रसिकांचा जीव भांड्यात पडला. सामन्यात ९ विकेट घेणा-या बुमराला सामनावीर घोषित करण्यात आले. इंग्लंडवर विजय मिळवलेल्या १०६ धावा फक्त एकट्या शुभमन गीलने दुस-या डावात केल्या. यशस्वी जैस्वालचे द्विशतक, शुभमन गिलचे शतक, बुमराची भेदक गोलंदाजी यामुळे टीम इंडिया १-१ बरोबरी करू शकली.
– डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर