23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeपरभणीआई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या : भूषण चांडक

आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या : भूषण चांडक

मानवत : आई वडिलांनी तुमच्या शिक्षणासाठी खूप परीश्रम घेतले आहेत. त्यांनी तुमच्यासाठी खूप मोठी स्वप्ने बघितली आहेत. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनो खूप मेहनत घ्या, असे प्रतिपादन अमूल दुध डेअरीचे संचालक भूषण चांडक यांनी केले.

मानवत येथील के. के. एम. महाविद्यालयात शनिवार, दि. १३ रोजी किस्टोन स्कूल ऑफ इंजिनियरिंग, पुणे, अभिनव फाउंडेशन, पुणे, मराठवाडा मित्रपरिवार व विदर्भ मित्र परिवार पिंपरी चिंचवड यांच्या वतीने शिवबा करियर समुपदेशन प्रवेश प्रक्रिया व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे होते.

पुढे बोलताना चांडक म्हणाले की, यशाचे मूल्यमापन पैशात नसून व्यक्तीने समाजासाठी, देशासाठी आणि संपूर्ण मानव जातीसाठी काय केले यावर अवलंबून आहे. इतरांच्याआयुष्यात सकारात्मक बदल करता येणे हे सर्वात मोठे यश असल्याचे सांगितले. यावेळी अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी बाबत डॉ. संदीप कदम, पुणे, वैद्यकीय क्षेत्रातील संधी बाबत डॉ. जगदीश शिंदे, पर्यटन क्षेत्रातील संधी बाबत अमोल चिलवंत, उद्योग व्यवसाय संदर्भात भूषण चांडक, शिवकुमारसिंह बायस, फार्मसी क्षेत्रातील संधी बाबत प्रा. गुणवंत आवचार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी समन्वयक नितीन चिलवंत यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. ए.एम. कापसे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. ए. एस. सोळंके यांनी केले. आभार प्रा. ए.बी.काकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.आर.आर. देशपांडे यांनी परिश्रम घेतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR