31.5 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeपरभणीपरभणीतून जागतिक स्तरावरील बालवैज्ञानिक निर्माण व्हावेत : डॉ. चिद्रवार

परभणीतून जागतिक स्तरावरील बालवैज्ञानिक निर्माण व्हावेत : डॉ. चिद्रवार

परभणी : मोरया फाउंडेशनच्या वतीने हंट फॉर ज्युनियर सायंटिस्टच्या माध्यमातुन जिल्ह्यातील बालवैज्ञानिकाना संधी उपलब्ध करुण देत त्यांच्यातील संशोधक वृत्ती जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत. बाल वैज्ञानिकांचे शहर म्हणून परभणीला नावलौकिक मिळावा. जुनिअर सायंटिस्ट्स व्हॅलि ही परभणीची नवीन ओळख निर्माण व्हावी, म्हणूनच हंट फॉर ज्युनियर सायंटिस्टच्या आयोजनातून विद्यार्थ्यांमधील जिज्ञासु, संशोधकपणा बाहेर येऊन जागतिक स्तरावरील बालवैज्ञानिक निर्माण व्हावेत अशी मोरया फॉउंडेशनची इच्छा असल्याचे प्रतिपादन आयोजक तथा फॉउंडेशनचे सचिव बालरोग तज्ञ डॉ.अभिजीत चिद्रवार यांनी केले.

शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात दि. १६ रोजी मोरया फाउंडेशनच्या वतीने हंट जुनियर सायंटिस्ट बालवैज्ञानिक मेळाव्याच्या आयोजना मागील भूमिका विषद करताना डॉ. चिद्रवार बोलत होते. या मेळाव्याचे उद्घाटन वरपुडकर शिक्षण संस्था सचिव प्रेरणा समशेर वरपुडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी मोरया फाउंडेशनच्या अध्यक्षा स्त्रीरोग तज्ञ डॉ. भावना चिद्रवार तर प्रमुख पाहुणे डॉ. संप्रिया राहुल पाटिल, फाउंडेशनचे सचिव बालरोग तज्ञ डॉ. अभिजीत चिद्रवार, लक्ष्मीकांत चिद्रवार, सुरेखा चिद्रवार आदिंची उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ.चिद्रवार म्हणाले, मागील ५ वर्षापासून परभणीतच बालवैज्ञानिक घड़ावेत यासाठी बाल वैज्ञानिक मेळावा आयोजित करत असल्याचे सांगितले. यावेळी प्रेरणा वरपुडकर, डॉ. संप्रिया पाटिल यांनी डॉ.चिद्रवार दाम्पत्य वैद्यकीय क्षेत्रासोबतच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातही अनमोल योगदान देत आहेत. त्यांनी बाल वैज्ञानिकांसाठी आजपर्यंत घेत असलेला स्तुत्य उपक्रम आहे. दरवर्षी बाल वैज्ञानिक आणि पालकांमध्ये या विज्ञान मेळाव्याची उत्सुकता लागलेली असते ही परभणीकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.

या बालविज्ञान मेळाव्यात ४० शाळा, १६० पेक्षा जास्त विज्ञान साहित्य, ३५० पेक्षा जास्त बालवैज्ञानिकांचा सहभाग होता. यावेळी परीक्षक म्हणून संजय पकवाने, संदीप मगर, डॉ. संदीप कार्ले, प्रसाद वाघमारे, डॉ. दीपक करजिकर, प्रा.डॉ. पवन कच्छवे, डॉ.मार्डिकर, दयाळ आदिनी काम पाहिले. प्रास्ताविक मोरया फाउंडेशनचे सचिव डॉ.अभिजीत चिद्रवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.राम देशमुख तर आभार डॉ. प्रभाकर नरवाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मोरया फाउंडेशनचे सर्व सदस्य, मोरया हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी आदींनी पुढाकार घेतला.

असे आहेत स्पर्धेतील विजेते बालवैज्ञानिक
या स्पर्धेत लहान गट प्रथम : रिद्धी कस्तुरे, आराध्या कुलकर्णी (बाल विद्या मंदिर, परभणी), द्वितीय : तेजस दळवी (ओयासिसी इंग्लिश स्कूल, परभणी), तृतीय : रणवीर भिसे, प्रथमेश यादव (श्री सारंग स्वामी विद्यालय, परभणी) तर उत्तेजनार्थ : राघव देशमुख, रिद्धी देशमुख यादव (श्री सारंग स्वामी विद्यालय, परभणी), ओजस करजीकर (पोदार इंटरनॅशनल स्कूल, परभणी) तर उत्कृष्ट सादरीकरणासाठी अलिया शेख (श्री सारंग स्वामी विद्यालय, परभणी) आणि उत्कृष्ट मॉडेलसाठि सय्यद अबुझर, सुमित खिल्लारे राजवर्धन खरात (न्यू इरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल,परभणी) यांनी क्रमांक पटकावला.

मोठा गट प्रथम : संस्कार देशमुख, नरेश साखरे (गांधी विद्यालय, परभणी), द्वितीय : प्रशांत चौधरी, प्रद्युम्न निकम (ओयासिसी इंग्लिश स्कूल,परभणी), तृतीय : यनान, ऋतुजा मोते, स्नेहा सोनवणे (ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल, परभणी), उत्तेजनार्थ : आदर्श मचाले (रामरावजी लोहठ पब्लिक स्कूल, परभणी), आकांक्षा भुमरे, सिद्धी वाटूरे (बेस्ट आयआयटी अ‍ॅन्ड नीट फौंडेशन, परभणी), उत्कृष्ट मॉडेलसाठी माऊली बुचाले (श्री सारंग स्वामी विद्यालय, परभणी) तर उत्कृष्ट सादरीकरणासाठी विराज पामे, अरविंद आवचार (रॉयल क्लीफ वर्ल्ड स्कूल, मानवत) यांनी यश मिळवले. यावेळी दोन्ही गटातील प्रथम विजेत्यास ५ हजार रोख, द्वितीय विजेत्यास ३ हजार रोख, तृतीय विजेत्यास २ हजार रोख व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR