कोलकाता : सुमारे साडेसात वर्षांपूर्वी 29 जणांसह बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या अल्ल-32 विमानाचे संभाव्य अवशेष बंगालच्या उपसागरात आढळून आले आहेत. बंगालच्या उपसागरात सुमारे 3.4 किमी खोलीवर या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत.
संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने तैनात केलेल्या ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकलने नुकत्याच घेतलेल्या छायाचित्रांच्या तपासणीत ही बाब समोर आली आहे. चेन्नईच्या किनाऱ्यापासून 310 किमी अंतरावर असलेल्या समुद्रात हे अवशेष आढळले आहेत. अठ-32 विमानाचे. छायाचित्रांची तपासणी केल्यानंतर ते एएन-32 विमानाशी जुळणारे असल्याचे आढळून आले.
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की त्या भागात इतर कोणत्याही बेपत्ता विमानाचे वृत्त अथवा माहिती नाही. त्यामुळे संभाव्य अपघातस्थळावरील हा शोध कदाचित अपघातग्रस्त 32 चे अवशेष असल्याचे दर्शवतो. नोंदणी क्रमांक के-2743 असलेले भारतीय हवाई दलाचे एएन-32 विमान 22 जुलै 2016 रोजी एका मोहिमेदरम्यान बंगालच्या उपसागरावरून बेपत्ता झाले होते. विमानात 29 कर्मचारी होते. विमान बेपत्ता झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली होती, परंतु बेपत्ता कर्मचारी किंवा विमानाचा ढिगारा सापडला नव्हता.