कर्जत : शेतक-यांना पूरक व्यवसाय म्हणून दुष्काळामध्ये दूध व्यवसायाची मोठी मदत झाली असती. परंतु, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज हा व्यवसाय संकटात सापडला आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील दत्तराज डेअरी फार्म या संस्थेचे चेअरमन दीपक भेगडे यांच्या पुढाकारातून संकटात असलेल्या दूध उत्पादक शेतक-यांसाठी दहा लाख रुपयांचा लाभांश आमदार पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. यावेळी ते बालेत होते.
यावेळी रघुनाथ काळदाते, सुनील शेलार, किरण पाटील, चेअरमन दीपक भेगडे, सतीश थेटे, अमोल तोरडमळ, भागवत ढोबे, डॉ. समीर ढोबे, विठ्ठल सावंत, सतीश किरदात, राजेंद्र डुबल, एमडी हसन पठाण आदींसह दूध उत्पादक उपस्थित होते.
यावेळी अनिल खरात, रामहरी महानवर, चंद्रकांत कुरळे, पोपट किरदात, दत्तात्रय पवार या दूध उत्पादक शेतक-यांचा आमदार पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.