सिंगापूर : फिल्म इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक जुबीन गार्ग यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जुबीन यांचे गँगस्टर चित्रपटातील ‘या अली’ हे गाणे तुफान गाजले होते.
नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी जुबीन हे सिंगापूरला गेले होते. तेथे स्कूबा डायविंग करताना त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जुबीन यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
जुबीन हे सिंगापूरला नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेले होते. त्यापूर्वी ते स्कूबा डायविंगसाठी गेले. स्कूबा डायविंग करत असताना जुबीन हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.