22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजनलग्नाच्या ३ वर्षांनंतर यामी गरोदर?

लग्नाच्या ३ वर्षांनंतर यामी गरोदर?

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतमने २०२३ मध्ये ‘ओह माय गॉड २’ मध्ये वकिलाची भूमिका साकारून लक्षवेधी काम केले. यामीच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचे झाले तर तिने २०२१ मध्ये दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले. आता लग्नाच्या ३ वर्षांनंतर यामी गरोदर असल्याची चर्चा आहे.
नुकताच यामीचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. जो व्हीडीओ पाहून यामी गरोदर असल्याची चर्चा आहे. यामीच्या व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या व्हीडीओत आदित्य धर तिच्यासोबत पांढ-या कुर्ता-पायजमामध्ये दिसत होता. मात्र, यादरम्यान यामीने अशी एक कृती केली जी पाहून लोक ती प्रेग्नंट असल्याचे म्हणू लागले.

यादरम्यान यामी तिचा बेबी बंप दुपट्ट्याने लपवताना दिसली. आता यामीची ही स्टाईल पाहून ती प्रेग्नंट असून लोकांना कळू नये म्हणून तिने तिचा बेबी बंप लपवला, असा अंदाज लोक लावत आहेत.
एका यूजरने लिहिले की, असं वाटतंय की यामी आई होणार आहे. दुस-या यूजरने लिहिले की, ‘बघा यामी प्रेग्नंट आहे.’ आता जर ही बातमी खरी असेल तर यामीच्या चाहत्यांना याचा खूप आनंद होईल. यामीकडून मात्र कोणताही अधिकृत खुलासा झाला नाही.

यामी गौतमच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं तर… ती आगामी ‘आर्टिकल ३७०’ या सिनेमातून भेटीला येणार आहे. जिओ स्टुडिओज आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ च्या मेकर्सकडून ‘आर्टिकल ३७०’ सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांची निर्मिती असलेला हा चित्रपट २३ फेब्रुवारी २०२४ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात यामीसोबत प्रियामणी झळकणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR