सोलापूर —सोलापूर शहर जिल्ह्यात घुमणार येळकोट येळकोट… जय मल्हारचा जयघोष…….. श्री खंडोबा देवाच्या यात्रेस होणार प्रारंभ…..” बाळे येथील श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर परिसरात आता सुरू होणार आहे. खंडोबा यात्रेच्या धार्मिक विधीस लवकरच प्रारंभ होणार आहे. यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे अन् खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार असून, मंदिरावर विद्युत रोषणाई बरोबरच रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे.
दरम्यान, सोमवार दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी श्रींच्या गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर चंपाषष्ठी निमित्त शनिवार ७ डिसेंबर २०२४ रोजी काकडा आरती अभिषेक व महापूजा पालखी सोहळ्याने यात्रेस उत्साहात, आनंदमय वातावरणात तसेच मंगलमय वाद्यांच्या तालावर प्रारंभ होणार आहे. शनिवार दी७ डिसेंबर रोजी चंपाषष्ठी निमित्त तसेच यात्रेचा पहिला रविवार दि. ८दुसरा रविवार १५. तिसरा रविवार २२ आणि चौथा रविवार २९ डिसेंबर २०२४ याचारही रविवारी खंडोबा देवाची यात्रा भरणार आहे.
चंपाषष्टी, शनिवार ,चार रविवार असे एकूण चार दिवस खंडोबा देवाची यात्रा भरणार आहे. दिवसभर जागरण गोंधळवाघ्या मुरळी नाचवणे, तळी भंडारा उचलणेवारू सोडणे, नवस फेडणे, जावळ काढणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेतया यात्रेत दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र या राज्यातून येतात.
याप्रत्येक रविवारी पहाटे ५.०० वाजता काकड आरती सकाळी ८.०० वाजता अभिषेक व महापूजा सायंकाळी ८.००वाजता अभिषेक महापूजा सायंकाळी ७.०० वाजता घोडा व नंदी ध्वजासह पालखी सोहळा होणार आहे.
तसेच यात्रेनिमित्त रविवार दि.५.०० जानेवारी रोजी महाप्रसाद वाटप कार्यक्रमाने या यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेचे मानकरी पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे व गावडे आदिसह इतर सर्व मानकरी व भाविकांना मानाचे विडे देऊन प्रसाद वाटप करण्यात येतो.
यात्रेच्या अनुषंगाने दरवर्षी मंदिरात होत असलेल्या भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदा मंदिर समिती प्रशासनाने दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विशेष दर्शनरांग तयार करण्यात येत आहे. स्त्रीयांसाठी वेगळी अन् पुरुष भाविकांसाठी वेगळी दर्शनरांग असणार आहे. दर्शनरांगेतील घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहे. मनपाने मंदिर परिसरातील खड्डे बुजविले आहेत.