मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवार आणि रविवारी (दि.२६) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. अवकाळीसह मध्यम पाऊस आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून हवामान खात्याने येथे यलो अलर्ट दिला आहे.
मुंबई हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितले की, आम्ही कमी दाबाची प्रणाली विकसित होण्याची अपेक्षा करत आहोत आणि त्याचा राज्यात लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईतही, गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.
गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, पुढील आठवड्यापर्यंत दक्षिण राजस्थान आणि मध्य प्रदेशात पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.