17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयतुम्ही विषारी सापांवर विश्वास ठेवू शकता, भाजपवर नाही

तुम्ही विषारी सापांवर विश्वास ठेवू शकता, भाजपवर नाही

कोलकाता : लोकसभा निवडणुकांची देशात जोरदार तयारी सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रॅलीला सुरुवात केली आहे. आज कूचबिहार येथील रॅलीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तुम्हाला तुमच्या विजयावर एवढा विश्वास आहे तर मग तुम्ही छापेमारी का करत आहात. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आदर्श आचारसंहिता पाळत नसल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. तुम्ही विषारी सापांवर विश्वास ठेवू शकता, पण भाजपवर नाही, असा टोला बॅनर्जी यांनी भाजपाला लगावला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, तुम्ही निवडणूक आयोग विकत घेतला आहे का, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. भाजपमध्ये असणे म्हणजे तुमचे चारित्र्य स्वच्छ आहे आणि तृणमूलमध्ये असणे म्हणजे तुम्ही घाणेरडे आहात असेही बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप तुम्हाला घर योजनेसाठी पुन्हा नाव नोंदवण्यास सांगत आहे, तुम्ही पुन्हा नाव का नोंदवायचे. वास्तविक त्यांना नामांकन हवे आहे, जेणेकरून नावे कापता येतील. तुम्ही विषारी सापावर विश्वास ठेवू शकता, तुम्ही त्याला पाळू शकता, पण भाजपवर कधीच विश्वास ठेवू नका, भाजप देशाला उद्ध्वस्त करत आहे, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला. टीएमसी केंद्रीय एजन्सींच्या धमकावण्या”पुढे झुकणार नाही, बॅनर्जींनी कूचबिहारमधील महिलांना १९ एप्रिलच्या निवडणुकांपूर्वी बीएसएफकडून स्थानिक लोकांवर अत्याचाराच्या घटना झाल्यास निषेध करण्याचे आवाहन केले. त्यांनी तक्रार नोंदवावी. केंद्रीय तपास यंत्रणा, एनआयए, आयकर, बीएसएफ आणि सीआयएसएफ भाजपसाठी काम करत आहेत, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR