मुंबई : नागपूरचे लोक हे शांत स्वभावाचे आहेत, तरीही त्या ठिकाणी दंगल कशी होते? नागपूरची दंगली ही पूर्वनियोजित होते असे म्हणता, मग तुम्ही काय हजामत करत होता का? अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारला टोला लगावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की राज्यात १२ दंगली राज्यात झाल्या आहेत. दंगली का होतात राज्यात दंगली वाढल्या त्याच कारण शोधले पाहिजे. नागपूर दंगल पूर्वनियोजित कट होता असे राज्य सरकार म्हणत आहे. हे माहिती होते तर मग तुम्ही काय हजामत करत होता का? नागपूरचे लोक हे शांत स्वभावाचे आहेत. तरी त्या ठिकाणी दंगल कशी होते? महाराष्ट्र सावरण्याचे काम मुख्यमंत्री यांनी करायला हवे.
सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी तरी चुकीच्या गोष्टींचे उदात्तीकरण करू नये. नाहीतर दावोसमध्ये करार केलेले १५ लाख कोटी दुसरीकडे जातील असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. जयंत पाटील म्हणाले की, नामदेव ढसाळ कोण आहे असा प्रश्न विचारला जातो. आम्ही मागणी केली होती की त्या अधिका-याला अटक करा आणि नामदेव ढसाळ यांचं साहित्य वाचायला द्या. सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू झाला याला पोलिस जबाबदार आहेत. त्याच्या आईला काय न्याय देणार आपण? अधिवेशन संपत आलं आहे, आता सोमनाथच्या
कुटुंबीयांना आपल्याला न्याय द्यावा लागेल.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीवरून जयंत पाटलांनी सरकारवर टीकेची झोड उडवली. ते म्हणाले की, “प्रशांत कोरटकर कोण आहे? तो छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करतोय. त्याला अटक करायला इतका उशीर का लागला? कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्यावर त्याला सुरक्षा का दिले जाते? कोरटकर छत्रपतींबद्दल एकेरी बोलतो. अटक झाली असेल तर सरकारन सांगावे. त्यानं
झक मारल्यावर त्याला सरंक्षण का दिले गेले?
कामरावर केस झाली पण सोलापूरकरवर केस का झाली नाही? महाराजांवर, इतर महापुरूषांवर जे बोलले त्यांच्यावर केस कराव्यात असं जयंत पाटील म्हणाले. या सभागृहाशी संबंध नसलेल्या लोकांना पाच-दहा सुरक्षा रक्षकांची सुरक्षा कशी दिली जाते असा प्रश्नही जयंत पाटील यांनी विचारला.