30.1 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार

कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार

व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी

कोल्हापूर : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर सराईत गुन्हेगार दत्ता गाडेने जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना ताजी असताना आता कोल्हापूरमध्ये सुद्धा असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे, तर नराधम आरोपीने शरीरसंबंधाचे व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, कोल्हापूर येथील नराधम आरोपी कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीतील असून त्याचे नाव विश्वजीत सचिन जाधव असे आहे. त्याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पीडित तरुणीने २०१८ पासून वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोनवेळा इच्छेविरुध्द गर्भपात करायला लावल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुण्यातील घटना ताजी असताना आता अशाच प्रकारची घटना कोल्हापूरमध्ये सुद्धा उघडकीस आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR