जळगाव : शिवाजी महाराजांनी स्वकीय भावना निर्माण केली. देश आज जो उभा आहे त्याची पायभरणी शिवाजी महाराजांनी केली. २०२४ च्या निवडणुकीबाबत बोलण्यासाठी आलो आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी मतदान आहे या गैरसमजात राहू नका. २०२७ ला विकसित भारत बनविण्यासाठी मतदान आहे. भविष्यासाठी मतदान आहे, युवकांच्या भविष्यासाठी मतदान आहे, असे आवाहन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी जळगाव येथील जाहीर सभेत केले.
उद्धव ठाकरेंना मुलगा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. जे नेते आपल्या पक्षात लोकशाही टिकवू शकले नाही, ते पक्ष देशात लोकशाही टिकवून ठेवू शकतील का? त्यांना त्यांच्या मुला-मुलींना मुख्यमंत्री बनवायचे आहे, तुमच्यासाठी काही नाही. तुमच्यासाठी फक्त मोदी आहेत.
पुलवामामध्ये दहशतवादी आले, १० दिवसांत पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्टाईक केले. ही मोदी गॅरंटी आहे.
काश्मीर आपला हिस्सा आहे की नाही? ३७० वे कलम ७० वर्ष काँग्रेसने हटविले नाही. मोदींना दोनदा पंतप्रधान केले त्यांनी ३७० कलम हटविले. राहुल गांधी म्हणत होते ‘खून की नदीया’ येतील. पण खून की नदी सोडा, एक दगड उचलण्याची हिम्मत कुणाची झाली नाही. गेली ५० वर्ष महाराष्ट्र शरद पवार यांना सहन करीत आहे, त्यांनी किमान ५ वर्षाचा तरी हिशेब जनतेला द्यावा, असे आवाहन अमित शहा यांनी केले.