जिंतूर : जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशन हद्दीतील रेपा या गावात दि. 15 डिसेंबर सायंकाळी सहाच्या सुमारास एका सुशिक्षित युवकांनी हाता पायावर पेन ने मराठा आरक्षण मुद्द्यावर लिहिलेल्या बेशुध्द अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यास मृत घोषित करण्यात आले असून मराठा आरक्षणा मुद्द्यावर आत्महत्या झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशन हद्दीतील रेपा या गावात दिनांक 15 डिसेंबर सायंकाळी सहाच्या सुमारास गावातील विवाहित युवक दत्ता शिवाजी पवार रा.रेपा जिंतूर या युवकांचा बेशुध्द अवस्थेत मृतदेह रेपा परिसरातील शेतात आढळून आल्याने गावकऱ्यांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचार साठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.मृतकाच्या पायावर (एक असला पाटिल मराठा आरक्षण 24 डिसेंबर ) तर दोन्ही हातावर मिशन मराठा 2024 आरक्षण 2023 काय करता 50 मराठा असा मजकूर लिहिलेला आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व मराठा आरक्षण समन्वय समिती चे माजी सैनिक बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे,एड माधव दाभाडे,लिखे, आदींनी रुग्णालयात दाखल झाले.जिंतूर पोलिस निरीक्षक दीपक तिडके,बोरी पोलीस सपोनी श्रीमती सरला गाडेकर,परभणी गोपनीय शाखेचे पोलिस हवालदार जिया खान पठाण यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल होत प्राथमिक पंचनामा केला मृतकाच्या पश्चात पत्नी,तीन मुली,आई वडील असून मृतकाचा चुलत भाऊ व नागरिकांचे म्हणणे होते कि मराठा आरक्षण मुद्द्यावरुण त्यानें स्वतः च्या हातांवर लिहून आत्महत्या केल्याचे संशय व्यक्त केला असून नेमके आत्महत्यांचे कारण समजू शकले नाही.