17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रजुलूसमध्ये विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

जुलूसमध्ये विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

पुणे : जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोन तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला. काही क्षणांतच ते जमिनीवर कोसळले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना पुणे शहरातील वडगाव शेरी परिसरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. पंचनामा करून मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

या थरारक घटनेचा व्हीडीओ समोर आला आहे. मृत आणि जखमी तरुणाचे नाव अद्याप समोर आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील आनंद पार्क येथे आज रविवारी सकाळच्या सुमारास जुलूस मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये अनेकजण सहभागी झाले होते.

यातील दोन तरुण डीजेवर चढून झेंडा फडकवत होते. अचानक झेंड्याचा विजेच्या तारांना स्पर्श झाला. डीजेवर चढलेल्या दोन्ही तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला. यातील एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. घडलेल्या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होता आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR