32.5 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील तरुणांना कौशल्याप्रमाणे रोजगार मिळणार : फडणवीस

राज्यातील तरुणांना कौशल्याप्रमाणे रोजगार मिळणार : फडणवीस

बारामती : अर्थसंकल्पामध्ये २ हजार कौशल्यविकास केंद्र उघडण्याचे जाहीर केले आहे. त्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. या रोजगार मेळाव्यात ५५ हजार पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. आतापर्यंत ३६ हजार अर्ज आले असून प्रत्येकाला कौशल्याप्रमाणे रोजगार मिळतील, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बारामतीतील नमो महारोजगार मेळावा झाला. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, चांगल्या कामाला एकत्र येण्याची आपली संस्कृती आहे.

तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. चांगले काम करत राहिलात तर आयुष्यभर प्रगती होईल. पहिला रोजगार मेळावा नागपूरला पार पडला. तेथे ११ हजार तरुणांना रोजगार मिळाला. ५० हजारपर्यंतचे पॅकेजेस मिळालीत. या मेळाव्यातूनही तरुणाईला मोठ्या रोजगार संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR