23.7 C
Latur
Wednesday, June 26, 2024
Homeसोलापूरअजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी युवकांनी परीश्रम घ्यावे

अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी युवकांनी परीश्रम घ्यावे

सोलापूर : पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे झालेल्या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यानी सर्व जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष यांनी सर्व फ्रंटल सेल यांना सोबत घेऊन पक्षाची संघटनात्मक ताकत वाढविण्यावर भर द्यावा अशा सुचना देऊन प्रत्येक फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष यांनी पक्ष कार्यासाठी वेळ द्यावा असा आदेश दिला त्या अनुषंगानेच आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आली या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्या राज्यसभेवर बिनविरोध खासदार पदी सुनेत्रा वहिनी पवार यांची निवड निश्चित झाल्याने अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

राष्ट्रवादी युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी धीरज शर्मा यांची निवड करण्यात आली त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. नुकतीच लोकसभा निवडणुक होऊन गेली आता विधानसभा आणि महापालिका निवडणुक जवळ येत असून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यात सर्व युवक पदाधिकाऱ्यानी सहभाग घ्यावा रात्रीचा दिवस करून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले.

राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना शहर मध्य विधानसभेची जागा महायुती मधून राष्ट्रवादीसाठी सोडवून घेण्याची विनंती केली असून त्यासाठी विधानसभेच्या सर्व बुथ नेमण्यात युवकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले बैठकीचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट कार्याध्यक्ष तुषार जक्का यांनी मांडले जेष्ठ नेते हेमंत दादा चौधरी आनंद मुस्तारे यांनी मार्गदर्शन केले .प्रदेश सरचिटणीस सनि देवकते समन्वयक दत्तात्रय बडगंची महेश कुलकर्णी यांनी आपले मत व्यक्त केले

या युवक आढावा बैठकीस
जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवक अध्यक्ष सुहास कदम युवक कार्याध्यक्ष तुषार झक्का ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे चेतन गायकवाड सनी देवकते दत्तात्रेय बडगंची महेश कुलकर्णी ओंकार हजारे अक्षय आवार कृष्णकांत जका,सर्फराज बागवान,अ.समद वेणूगोपाल गडगी प्रकाश गुंडला मुजफ्फर बागवान मुसइ बागवान आधी पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR