मुंबई : आई-मुलांच्या असभ्य व्हिडिओंना प्लॅटफॉर्मवर स्थान दिल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी यूट्यूब विरोधात तक्रार दाखल केली आहे.
लहान मुलांच्या अधिकारांसाठी लढणा-या एनसीपीसीआर आयोगाकडून याबाबत आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी यूट्यूब इंडिया विरोधात अशा व्हिडिओ प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी हे विशिष्ठ चॅनेल चालवणा-या ऑपरेटर विरोधातही बाल लैंगिक गुन्हा प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. या चॅनेल ऑपरेटरने आई-मुलांच्या ‘चॅलेंज व्हिडिओं’ना उद्युक्त केले होते.
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने यूट्यूब इंडियाच्या भारतातील अधिका-याला १५ जानेवारी रोजी अशा प्रकारच्या चॅनेल्सशी यादी घेऊन हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅलेंज व्हिडिओमध्ये मुलगा आणि अल्पवयीन मुलाचे चुंबन घेण्यासाठी सांगण्यात येत होते.