38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeक्रीडायूसुफ पठाण हार्दिक पांड्यावर संतापला

यूसुफ पठाण हार्दिक पांड्यावर संतापला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आयपीएलच्या १७ व्या मोसमात मुंबईला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात सलग दुस-या पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात बुधवार, २७ मार्चच्या सामन्यात हैदराबादने ३१ धावांनी विजय मिळविला. कर्णधार हार्दिकने पहिल्या ११ ओव्हरपैकी १ओव्हरच बुमराहला दिली. याच मुद्यावरून सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटू यूसुफ पठाण याने हार्दिकला खडेबोल सुनावले आहेत.

दरम्यान, मुंबईने विजयासाठी मिळालेल्या २७८ धावांचा पाठलाग करताना २४६ धावांपर्यंत मजल मारली. त्याआधी मुंबईने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडले. हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईची बॉलिंग फोडून काढली. जसप्रीत बुमराह या एकमेव गोलंदाजाने टिच्चून मारा करत फक्त ९ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. मात्र कॅप्टन हार्दिकने पहिल्या ११ ओव्हरपैकी १ ओव्हरच बुमराहला दिली. याच मुद्यावरून सोशल मीडियावर हार्दिक पांड्या ट्रोल होत आहे.

याच घटनेवर यूसुफ पठाण याने एक्सवर (ट्वीटर) पोस्ट करत हार्दिकच्या कर्णधारपदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच हार्दिकच्या निकृष्ट नेतृत्वामुळेच हैदराबादला २५० पेक्षा अधिक धावा करता आल्या, असेही यूसुफने म्हटले आहे. एकूणच काय तर यूसुफने हार्दिकची चांगलीच शाळा घेतली आहे. तसेच हार्दिकच्या न पटलेल्या निर्णयाबाबतही त्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

हार्दिकवर माजी क्रिकेटपटूंचा संताप
दरम्यान हार्दिकवर मुंबईच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केलीच आहे. हार्दिकला नेटक-यांच्या टीकेचा सामना करावा लागतोय. अशात हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर हार्दिकवर माजी क्रिकेटपटूंनी टीकेची झोड उठवली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR