38.3 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रलोकल तंत्रज्ञान ग्लोबल व्हावे; पद्मश्री डॉ.प्रल्हाद रामराव

लोकल तंत्रज्ञान ग्लोबल व्हावे; पद्मश्री डॉ.प्रल्हाद रामराव

पुणे : प्रतिनिधी
भारतातील तंत्रज्ञानाने सध्या जगाला भुरळ घातली आहे. चांद्रयान सारख्या अंतराळ मोहीमा, जगातील सर्वांत मजबूत मिसाईल, विविध प्रकारचे ट्रोन्स बनवून आपल्या शास्त्रज्ञांनी जगाचे लक्ष आकर्षित केले आहे. भारत आता सॉफ्टवेअरसह हार्डवेअर क्षेत्रातही स्वावलंबी बनला आहे. त्यामुळे या स्पर्धात्मक युगात आपल्याकडील लोकल तंत्रज्ञानाला प्रचंड मागणी मिळत असल्याने ते ग्लोबल व्हायला हवे, असे मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे(डीआरडीओ) माजी संचालक व एस-व्यासा विद्यापीठ बंगळुरूचे प्र.कुलगुरू पद्मश्री डॉ.प्रल्हाद रामराव यांनी मांडले.

ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात ‘इनोव्हेटिव्ह ग्लोबल टेक्नॉलॉजी ट्रेंड्स’ या विषयावर आधारीत सहाव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. याप्रसंगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ.पराग काळकर, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड, विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डॉ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ.मोहीत दुबे, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, डॉ.विरेंद्र भोजवानी आदी उपस्थित होते.

दीपप्रज्वलन व सरस्वती पूजेद्वारे सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.सुनीता कराड यांनी तर आभार डॉ.रामचंद्र पुजेरी यांनी मानले. तर डॉ.स्रेहा वाघटकर व डॉ.स्वप्निल शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पसायदान द्वारा कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR