चारठाणा : कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या युवा संघर्ष यात्रेचे देवगाव फाटा व चारठाणा येथे ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले. आ. पवार यांनी युवा संघर्ष यात्रा निमित्त देवगाव फाटा व चारठाणा येथे नागरीकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत रोहित आर आर पाटील हेही उपस्थित होते.
युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून समाज हिताचे प्रश्न आपण पुढे घेवून जात असल्याने संघर्ष यात्रेला कुठेही विरोध होत नसल्याचे आ. पवार यांनी यावेळी सांगितले. राज्यांमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणाबाबत बोलताना सांगितले की अधिवेशनात एक दिवस संपूर्ण मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे व त्यावेळी आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रश्न उपस्थित करणार असून मराठा आरक्षण आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष माजी आ.विजय गव्हाणे, खा. संजय जाधव, माजी आ.विजयराव भांबळे, प्रेक्षा भांबळे, अजय चौधरी, प्रसाद बुधवंत, बाळासाहेब भांबळे, प्रशांत पावडे, मनोज थिटे, विजय खिस्ते, विशाल देशमुख, शेख महेमुद, इरफान लाला, अविनाश मस्के, सुभाष चव्हाण, तुकाराम ताठे, साईनाथ मोगल, सुधाकर रोकडे, पवन मोरे, विनोद तरटे, राजेश्वर मोरे यांच्यासह चारठाणा येथील राष्ट्रवादी कार्यकर्ते मा.पं.स.स. सलीम उद्दीन काजी, मधुकर भवाळे, मा.उपसरपंच जलील इनामदार, मा.ग्रा.प.सदस्य सय्यद इमरान, सय्यद दाऊद आली, शेख सुलेमान, उत्तम मेह्त्रे, तारेख देशमुख, अरेफ कुरेशी, निसार देशमुख, रसूल पठाण, शेख रईस व रॉका पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफने यांच्या मार्गदर्शनाखाली चारठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विनोद साने व त्यांच्या सोबत इतर कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी शेतकरी, मजूर, विद्यार्थी विविध गावातील आजी-माजी कार्यकर्ते व्यापारी वर्ग, प्रतिष्ठित नागरिकांनी आ.रोहित पवार यांच्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थिती होती.