30.8 C
Latur
Thursday, April 17, 2025
Homeसोलापूरअक्षता सोहळ्यानिमित्त ओमसाई प्रतिष्ठानतर्फे भक्तांना अक्षता वाटप

अक्षता सोहळ्यानिमित्त ओमसाई प्रतिष्ठानतर्फे भक्तांना अक्षता वाटप

सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर महाराज यांच्या अक्षता सोहळ्यानिमित्त ओमसाई प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने श्री. सिद्धरामेश्वर महाराजांच्या साधारण ४००० भाविक भक्तांना अक्षता वाटप करण्यात आले.

याप्रसंगी महावितरण सोलापूर शहर विभाग कार्यकारी अभियंता आशिष मेहता , नाशिक प्रशिक्षण केंद्राचे कार्यकारी अभियंता आर.सी. पाटील , औद्योगिक वसाहत कार्यालय शाखाधिकारी अजय चव्हाण , शुभराय टॉवर शाखाधिकारी उल्हास कानगुडे , श्रीकांत घाडगे, ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनोद कर्पेकर, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे,

अपरिचित सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष मयूर गवते, रुपेश कर्पेकर, धर्मेंद्र कर्पेकर, शुभम कर्पेकर, सतिश म्हमाणे, राजाभाऊ राचुरे व भाविक भक्त उपस्थित होते. तसेच यावेळी महावितरण मधील अधिकारी यांचे ओमसाई प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने शाल घालून स्वागत करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR